
दैनिक चालु वार्ता
उपसंपादक मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर
समाजसेविका कविता वाघ(घुगे) यांना भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघा तर्फे पुणे येथे मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते “समाजरत्न”पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भगवान बाबा बालिकाश्रम.सातारा परिसर, संभाजीनगर.
योगेश्वरी बालक आश्रम. सातारा परिसर, संभाजीनगर.
भगवान बाबा बालकाश्रम वासडी, कन्नड.
महिला ट्रेनिंग सेंटर, संभाजीनगर
या युनिटच्या माध्यमातून कविताताई वाघ (घुगे)अठरा वर्षे झाले वंचित, अनाथ, दुखी ,पीडितांची सेवा करत आहे. पूर्णतःअनाथ मुले,निराधार,निराश्रित, वंचित, उपेक्षित, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचे पाल्य, एक पालक असणारी पाल्य,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य,शिकण्याची परिस्थिती नाही अशी मुलं आश्रमात येतात.आश्रमात मुलं लहानाची मोठी होतात.त्यांना लिहायला वाचायला शिकवले जाते.संस्कार आणि स्वावलंबन या दृष्टीने मुलांना शिक्षण देऊन ही मुलं स्वतःच्या पायावर कशी उभी राहतील हा उद्देश असतो.आश्रमात एक आदर्श नागरिक घडवला जातो.आजवर हजारो मुलांच्या जगण्याचा आधार ही माय माऊली झाली आहे.
नवऱ्याने टाकून दिलं,सांभाळ करायला कोणीही नाही अशाही महिलांचा सांभाळ कविता वाघ करत आहे. महिलांना मारहाण झाली, संसार व्यवस्तीत चालत नाही,नवरा बायकोत वाद झाले अशाही महिलांचं संगोपन व पुर्नवसन “महिला सखी सेंटर” च्या माध्यमातून होते.
मुलांवर चांगले संस्कार होतात म्हणूनच अनेक पालक आपल्या मुलांसाठी स्थळ शोधत येतात. आजवर पंधरा ते वीस मुलींचे लग्न कविता वाघ यांनी लावून दिले. उच्चशिक्षित, नोकरदार, सधन कुटुंबात मुली मालकीण झाल्या. कविता वाघ यांनी आई बरोबर बापाची भूमिका खंबीरपणे निभावली आहे.
कविता वाघ(घुगे)यांना विचार सुचतो एखादं नवीन केंद्र उघडण्याचं, वृद्ध किंवा गरजूसाठी निवास उभारण्याचा.
वेदनाग्रस्तांचे ओझे स्वतः कविता वाघ(घुगे) यांनी आपल्या खांद्यावर घेतले आहे. देव पुरेसं देईल असा त्यांना भरोसा आहे आणि देवाने त्यांना कधीच निराश केले नाही.सामाजिक कार्याची दखल समाजाने घेतली आहे.आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहे.कविता वाघ यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.