
सीएससी केंद्रांना अजूनही कमिशन नाही उलटे डबल काम…
दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)- शेतकरी बांधवांना शेती करताना सातत्याने विविध अशा अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळेल या अनुषंगाने केंद्र शासनाने पिक विमा योजना सुरु केली आहे. शेतकरी बांधव देखील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास आपल्याला किमान भरपाई मिळेल म्हणून या योजनेत सहभाग नोंदवतात. सरकारने एक रुपयात पीकविमा शेतक्यांना उपलब्ध करून दिला, पण त्यानंतर विमा कंपन्यांनी जी शक्कल लढवली ती शेतकच्यांना धडकी भरवणारी ठरली. ७२तासांत शेतक्यांना पीक नुकसानीची तक्रार करावी लागणार आहे.
दीड महिने पावसाने दड़ी मारल्याने शेतकन्यांची पिके वाया गेलली आहेत. उरलीसुरली पिकेही गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिपावसामुळे वाया गेल्यात जमा आहेत. इंटरनेट सुविधेअभावी अनेक शेतकरी ठरवून दिलेल्या काळात तक्रार करूशकत नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीही ७२ तासांत तक्रारीची अट घालून विमा कंपन्या हात वर करू पाहत असल्याच्या शेतकन्यांच्या तक्रारी आहेत. मात्र पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान होऊन देखील नुकसानीची भरपाई मिळत नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. यामुळे नेमकी ही पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू झाली आहे की पिक विमा कंपन्यांसाठी हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे आता ही मदत संबंधित शेतकऱ्यांना केव्हा मिळेल याबाबत कोणीही ठामपणे आणि सुयोग्य अशी माहिती देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे अशा भावना तालूक्यातून उमटू लागल्या आहेत.
पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) यांना शेतकऱ्यांकडून पिकविमा अर्ज भरणा करण्यासाठी चार्जेस घेऊ नये सीएससीला ३२रु प्रती अर्ज देन्यात येईल असा शासन अध्यादेश राज्याचे कृषी आयुक्त व जिल्ह्याधिकारी यांनी सागितले होते परंतू त्याला दोन महीने झाले पन अजून केंद्र चालकांना एक रुपयाही कपनीकडून मिळालेला नाहीत व उलट शेतकऱ्यांचे अर्ज कारण नसतांनी वापस पाठवून केंद्र चालकास डबल काम करायला लावत आहेत त्यामूळे पिक विमा भरुन सीएससी ने चूक केली आहेत असे मत ते व्यक्त करत आहेत केंद्रांना दूकानभाडे,लाईटबिल, सूविधांसाठी लागनारा खर्च खिशातून करावा लागतोय त्यामूळे पूढिल पिकविमा भरणा केंद्र चालक करेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत
*सर्व सीएससी केंद्र चालक यांना पीकविमा बाबत सूचना आहे कि कारण नसतानी जर पीकविमा कंपनी फॉर्म रिव्हट करत आहे सीएससीने या गोष्टी सर्व या अधिकारी यांना सांगितल्या आहे पण ते अधिकारी काहीच मदत करत नाही.ज्यांचे रिव्हट फॉर्म पुन्हा पुन्हा परत येत असेल तर यांनी लेखी तक्रार तालुका कृषीअधिकारी यांच्याकडे द्यावी…