
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :सेवा पंधरवडा निमित्त (दि.१) रविवार रोजी सातेगाव स्मशनभूमी येथे स्वच्छता अभियान सकाळी १० वाजता राबविण्यात आले.यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत सातेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्राम स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली.स्मशानभूमीतील गेट आणि भिंतींना रंग-रंगोटी करून स्वच्छ करण्यात आले.
या कार्यक्रमवेळी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार रमेश बुंदीले,डॉ.विलासराव कविटकर (जिल्हा महामंत्री),विक्रम कमलाकरराव पाठक (जिल्हा उपाध्यक्ष),नंदु काळे (जिल्हा सचिव),पद्माकर सांगोळे (जिल्हा अध्यक्ष ओबीसी आघाडी),मनीष मेन,मिलिंद गोतमारे,काळे सर,सरपंच,उपसरपंच,भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.