
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
गेवराई:- मधील उमापूर पासून काही अंतरावर मजूर वर्गव बंजारा समाजातील युवकाला ,
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2023 सोमवार रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संस्था पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरविण्यात आलेले महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त कै अच्युतराव रसाळ स्मृति वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या या वकृत्व स्पर्धेमध्ये आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण घेणारा ठाकरवाडी तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथील चव्हाण सुनील नामदेव याने या वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून या वकृत्व स्पर्धेचा विजेता ठरला यामुळे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
तरुण मुलं कॉलेज जीवनात गेल्यानंतर मौज मस्ती करतात पण एक शेतकरी कामगाराचा मुलगा आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या आई-वडिलांचे नाव ठाकरवाडी तांड्याचे नाव आणि आपल्या शाळेचे नाव लौकिक करत आहे.