
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :-जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज ही नांदेड जिल्हामध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली व गुणवत्ता असलेली शाळा आहे. सदरील शाळेवर वर्ग २ चे मुख्याध्यापक पद हे रिक्त असून त्याचा पदभार माध्यमिक शिक्षक पी.जी. कारभारी सांभाळत आहेत. (अगदी थोडक्यात आणि स्पष्टपणे N.M.M.S. प्रकरणात ते 100% दोषी आहेत. त्यांच्यामुळेच विद्यार्थ्याचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झालेले आहे. ते पेठवडजचे स्थानिक रहिवाशी असून त्यांचा मुळ स्वभाव हुकूमशाही व राजकारणी वृत्तीचा आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या विरोधात तक्रार करणारे, नारायण गायकवाड व विजय राजे हे त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत. मागील मुख्याध्यापक पांचाळ सर, यांना हटवून त्यांच्या जागी कारभारी सर यांची नेमणूक करण्याच्या बदल्यात मुख्याध्यापक पदाचा गैरवापर करुन विजय राजे यांना शा. व्य. समितीचा अध्यक्ष करण्याचे त्यांनी खाजगीमध्ये वचन दिलेलं होतं. पण समिती निवडीच्या वेळी सर्व पालकांनी बहुमताने / बिनविरोधपणे सर्व सदस्यांनी हरिश्चंद्र राजे यांची अध्यक्ष व अविनाश मेकवाड यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली.सर्व पालकांच्या जागरूक पणामुळे त्यांचं वैयक्तिक दिलेलं वचन फसलं. वचन न पाळल्यामुळे त्यांच्याच घनिष्ठ मित्रांनी त्यांनाच अडचणीत आणण्यासाठी (नियमबाह्य समिती) हा बिनबुडाचा आरोप आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी कारभारी त्यांची वैयक्तिक आहे. नवीन समिती अस्तित्वात आल्यापासून त्यांना हूकूमशाही वृत्तीतून व राजकारणातून बाहेर येऊन शाळेची गुणवत्ता विद्यार्थ्यांच हित जोपासण्यासाठी प्रयत्न करा असं खूप समजावत आहे. पण ते समजून घ्यायच्या मानसिक तयारीत नाहीत. सध्या परिस्थितीत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेला आहे. त्यामुळे अधून मधून नशाही करतात. ते पद सांभाळण्याची त्यांची क्षमता राहिली नाही. त्यामुळे त्यांच्या हातून अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यांच्या चुकामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता घसरत आहे. विद्यार्थी/पालक/ शिक्षक यांच्या मध्ये नाराजी आहे सर्व विद्यार्थी/शिक्षक त्यांच्या वर्तणुकीला कंटाळले आहेत. त्यांनी मनमानीपणाचा मर्यादा ओलांडली आहे. ते पदावर राहणं शाळेला / विद्यार्थ्यांना परवडणार नाही. ते या पदावर राहिले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक/आर्थिक नुकसान होईल त्यासाठी त्यांना या पदावरून त्वरित हटवण्यात यावं व भविष्यात होणार विद्यार्थ्याचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळाव अशी मागणी जि.प.हायस्कुल पेठवडज शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र राजे यांनी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.