
तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे केली निवेदणाद्वारे मागणी…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा दवणे जालना (मंठा )
शासनाने राज्यातील १२ अतिमागास जिल्हयांचा मानव विकास निर्देशांक
उंचावण्याकरिता दि. २९ जून २००६ अन्वये मानव विकास मिशनची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सन २०११-१२ पासून शासन दिनांक १९ जुलै २०११ अन्वये मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती २२ जिल्हयांतील १२५ तालुक्यांपर्यंत वाढविण्यात आली. या योजने अंतर्गत निवड केलेले २२ जिल्यामधे जालना जिल्ह्याचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत
प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये प्रत्येक महिन्यात किमान २ शिबीरे आयोजित करण्यात येतात. शिबीरे आयोजनाबाबतची माहिती सर्व संबधित ग्रामपंचायतींच्या आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना देण्यात येते. शिबीराच्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोग तज्ञ यांचेकडून लाभार्थ्यांची वैदयकीय तपासणी व उपचार केले जातात, एक वेळचा अल्पोपहार लाभार्थ्यांना देण्यात येतो. गरोदर मातांचा व ६ महिन्यांपर्यंत स्तनदा मातांचा पाठपुरावा केला जातो. तसेच जोखमीच्या मातांना उपचार व संदर्भीत केले जाते व पाठपुरावा करण्यात येतो व
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लाभार्थ्यांना ने-आण करण्याकरिता केंद्राच्या वाहनाचा वापर करता येतो. जेथे वाहन उपलब्ध नसेल त्या ठिकाणी वाहने भाडयाने घेणे, स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ यांना मानधन देणे, शिबिरामध्ये लाभार्थ्यांना एक वेळ अल्पोपहार देणे, औषधे व प्रयोगशाळा साहित्य आणि मंडप व्यवस्था याकरीता अनुदान देण्यात येते. अ.जा./अ.ज./ दारिद्रय रेषेखालील गरोदर मातांना बुडित मजुरीपोटी रु.८००/- गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात देण्यात येते.परंतु या योजने अंतर्गत मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे प्राथमिक केंद्रात अंमलबजावणी होती का याची चौकशी करण्याची मागणी विजेंद्र मस्के यांनी तालुका आरोग्याधिकारी यांच्याकडे निवेदणाद्वारे केली आहे. सविस्तर माहिती अशी की
देफळ खंदारे आरोग्य केंद्रामध्ये मानव विकास मशीन अंतर्गत २०२० ते २०२३ पर्यंत जे शिबीर घेण्यात आली त्या शिबिरा मधील सर्व खर्चाची चौकशी गावकार्या समक्ष करून त्याचा तपशील मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर विजेंद्र मस्के यांची स्वाक्षरी होती…