
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
जिल्ह्यातील साक्री, शिरपूर तसेच शिंदखेडा तालुक्यामध्ये पडलेल्या पावसामुळे तुर, कांदा व मका पिकाचे नुकसान झाले.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. यादरम्यान धुळे शहरात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. परंतु जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. बळीराजाला वारंवार अवकाळीचा फटका बसत आहे.
कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.