
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
सातारा :जिल्हा पोलीस दलामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आँचल दलाला-डुडी यांची नियुक्ती झाली असून यापूर्वी त्यांनी साताऱ्यातच सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या त्या पत्नी असून. सातारच्या इतिहासात प्रथमच जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक अशी पती-पत्नी सेवा बजावणार आहेत. साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांची पिंपरी-चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची सुमारे एक वर्षांपूर्वीच साताऱ्यात काम केले होते त्यांची सांगली येथे बदली झाली होती साताऱ्यात असताना. निर्भया पथक यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले, कडक आणि शिस्तींच्या अधिकारी म्हणून त्यांची साताऱ्यात चांगलीच ओळख राहिली. एका वर्षातच पुन्हा त्यांची सातारला बदली झाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर नोव्हेंबर २०२२ मध्ये सातारा पोलीस दलात रुजू झाले होते. तत्पूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे यांचा कालावधी पूर्ण होण्याआधींच त्यांच्या जागी बापू बांगर आले होते. पोलीस बापू बांगर हे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासोबत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले, पुसेसावळीतील घटनेच्या अनुषंगाने बापू बांगर हे तेथेच तळ ठोकून होते. तर श्रीमती आँचल दलाल या साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या बहिण आहेत. तर त्यांचे पती सध्या सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी या पदावर सेवा बजावत आहेत. आता त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्याच्या इतिहासांत प्रथमच पती-पत्नी सेवा बजावणार आहेत…