
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : अल्पावधीतच शिरूर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक पटलावर नावारुपाला आलेलं एक उभरतं, दिलदार, दिलखुलास, जिगरबाज, प्रेमळ, मनमिळावू, युवा नेतृत्वं,म्हणून नावारूपाला आलेले राहुलदादा करपे पाटील यांचा वाढदिवस सत्कार समारंभ या गोष्टीना फाटा देत सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाणे संपन्न झाला.
कोणतही राजकीय पद नसताना गेल्या दीड वर्षांपासून तळेगांव ढमढेरे—रांजणगांव सांडस जिल्हा परिषद गटामधील लोकांच्या सुख—दुःखामध्ये ते सहभागी होत आहेत. त्याचबरोबर, लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न, शिरूर—हवेली तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, सन्माननीय अॅड्.अशोकबापू पवार यांच्या नेतृत्वाखाली करीत आहेत.
तळेगांव ढमढेरे रांजणगांव सांडस गटामध्ये सामाजिक चळवळ उभी करण्याबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविन्याचे काम त्यांनी मोठया प्रमाणात केले. युवकांची एक मोठी फळी त्यांनी आपल्या गोड स्वभावातून उभी केली.आज त्यांनी वाढदिवसानिमित्तं ग्रामस्वच्छता अभियान,गरजू लोकांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून कॅम्प आयोजित केला होता.आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, कृषी एकात्मिक बालविकास, भूमि अभिलेख, पशुवैद्यकिय आदी विभागामार्फत सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला.नवीन रेशन कार्ड, शासकीय प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नाॅन क्रिमिलियर दाखला, मतदार नोंदणी, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग प्रमाणपत्र काढणे, सुकन्या समृद्धी योजना, जेष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना ज्या गरिबांपर्यंत पोहचू शकत नाही त्या योजनेचा लाभ त्यांनी आज वाढदिवसानिमित्त परिसरातील गरजूना दिला.त्याचबरोबर भजन स्पर्धेचही आयोजन केलं होते. यात बक्षिसे आणि प्रत्येक भजनी मंडळास ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
अंध, अपंग तसेच, समाजातील उपेक्षित वर्गांसाठी भरीव असं काम करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या लोकोपयोगी कार्याची दखल समाज घेतल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की ! असे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार अशोकबापू पवार यांनी बोलताना सांगितले.या कार्यक्रमास घोडगंगा कारखान्याचे संचालक प्राध्यापक भाऊसाहेब भोसले मा पंचायत समिती सदस्य सुनील तात्या वडघुले,दूध संघाचे संचालक निखिल तांबे, पांडुरंग ढोरे,विजय शिर्के, शहाजी काळे, संपत वडघुले, शिरूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विद्याताई भुजबळ, तळेगाव ढमढेरे चे उपसरपंच राहुल दादा भुजबळ, माजी उपसरपंच गणेश तोडकर, हनुमंत काळे,दादा रणसिंग, कैलास रणसिंग, लालासाहेब वाकचौरे, अशोक दादा भोसले, रोहित खैरे,शिवसेना तालुका अध्यक्ष पोपट शेलार, निमगाव माळुंगी सरपंच सविता कर्पे, शांतीदेव शिंदे, राजेंद्र जाधव,स्वप्निल शिंदे, सचिन वाळके, दत्ता असोले,संतोष इंगळे, लहू इंगळे, ह भ प दयानंद पवार, ह भ प नवनाथ भोसले, ह भ प सुनीता ठोंबरे,कवितके रवींद्र, मुनी पंजाबी ,पुनम ताई नळकांडे,अनिलराव हरगुडे,पोलीस पाटील प्रकाश कर्पे, आबासाहेब शेलार, कुंडलिक येळे,पांडुरंग दरेकर,जालिंदर पवार,ई.उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश वडघुले यांनी केले तर आभार राहुल कर्पे यांनी मानले.