दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर):आज इंदापूर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने खासदार संजय सिंह यांच्यावरती चुकीचा आरोप करून ED ने अटक केली आहे.या अटकेच्या विरुद्ध व मोदी सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
खासदार संजय सिंह यांना ईडीचा धाक दाखवून अटक करण्यात आली . भारत देशामध्ये आम आदमी पार्टीचे घटनेनुसार प्रामाणिकपणे काम वेगाने चालू आहे. जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून त्याची सल सतत भारतीय जनता पार्टीला बोचत आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर सरकार कारवाई करत आहे. येणाऱ्या २०२४ ला लोकशाहीच्या माध्यमातून जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी आम आदमी पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते, तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील, युवक अध्यक्ष अविनाश जाधव, मधुकर पाटील, राजकुमार रासकर, तुकाराम पारेकर,विक्रांत जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.