दै.चालु वार्ता
पेठवडज प्रतिनिधी गजानन जाधव
नांदेड/कंधार:-नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील पेठवडज येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण ओबीसी मधूनच मिळाले पाहिजे म्हणून मराठा योध्दा श्री. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पेठवडज येथे आज तेवीस दिवसापासून साखळी उपोषण सुरू असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी. कळका व सिरसी बु येथील गावकऱ्यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पेठवडज ता. कंधार येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच सिरसी बु येथील भजनी मंडळींनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी समाज प्रबोधनपर भजन करून जनजागृतीचे कार्य केले. असे सकल मराठा समाज कळका व सिरसी बु ता. कंधार जि. नांदेड यांनी सांगितले आहे.