प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल जालना…
अंबड प्रतिनिधी
ज्ञानेश्वर साळुंके
आज दिनांक रोजी 5 .10 .2023 मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय जालना श्रीमती व्ही .एम. मोहिते मॅडम यांची आरोपी सोमिनाथ विनायक सिरसाठ वय 36 वर्ष रा. वाकडी ता. भोकरदन जिल्हा जालना या आरोपीस मरणाऱ्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम 304(।।)भादवी मध्ये पाच वर्षाची सश्रम करावासाची शिक्षक व वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याची कारावास कलम ३४१ भादवी मध्ये १ महिना सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास महिना भरल्यास पंधरा दिवस कारावास अशी शिक्षा ठोठवली.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 13/05/2022 रोजी 18 वाजेच्या सुमारास आरोपी सोमीनाथ यांने फिर्यादीचे काका जगन याला मौजे जानेफळ गायकवाड शिवारातील जानेफळ गायकवाड ते वाकडी जाणारा डांबरी रस्त्यावर समाधान वाळुबा सोनुन यांचे शेत गट नंबर 164 जवळ आरोपी मयातीचे होंडा स्कूटरला मोटरसायकल आडवी लावून मोजे सारख्या पिर येथे दिनांक 13. 5. 2022 रोजी 17 ते 17:30 च्या वाजेच्या दरम्यांनी पत्रवाळ्या उचलण्याच्या कारणावरून झालेल्या बोलावली वरून त्याने अडवून मयताची अवघड जागा धरून जोरात दाबून मयतास जिवे ठार मारले.
म्हणून फिर्यादीची फिर्यादी वरून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन पारध येथे गुन्हा क्र. 112/ 2022 कलम 302 341 332 294 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होवुन तपासा अंती मा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले
सरकारी पक्षातर्फे सदर या प्रकरणीत एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्याद प्रत्यक्ष साक्षीदार पंच साक्षीदार डॉ रोहन राऊत इतर साक्षीदार. व तपासीक अंमलदार श्री अभिजीत साहेबराव मोरे .सहा .पोलीस.पोलीस स्टेशन पारध यांच्या साक्षी महत्वच्या ठरल्या.
मा. न्यायालय पुढे सरकारी पक्षतर्फे आलेल्या साक्षीपुरावा व दोन्ही बाजूचा युकतीवादी लक्षात घेवुन मा. श्रीमती. व्ही. एम. मोहिते मॅडम यांनी आरोपी सोमिनाथ विनायक सिरसाठ वय 36 रा. वाकडी ता. भोकरदन जिल्हा जालना या आरोपीस मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम 304(!!) भादवी मध्ये पाच वर्षाची सक्षम कारवासाची शिक्षा व वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याची कारवास कलम 323 भादवी मध्ये सहा महिने सश्रम कारवास व एक हजार रुपये दंड व दंड न घडल्यास एक महिना कारवास. कलम 341भादवी मध्ये एक महिना सश्रम कारवास व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस कारवास अशी शिक्षा ठोठवली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता अडॅ भारत के खांडेकर यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली…