दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : ऑल इंडिया डाक सेवक युनियन AIGDSU , नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक संघटना NUGDS यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने अमरावती विभागाअंतर्गत एक दिवशीय देशव्यापी संपात अंजनगाव मेन पोस्ट ऑफिस समोर दि.४ ऑक्टोबर रोजी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण डाक सेवक हे एक दिवसीय संपात सहभागी झालेत.
डाक सेवक यांच्या विविध मागण्यांमध्ये जीडीएस समितीने शिफारस केल्याप्रमाणे १२,२४,३६ सर्व वरिष्ठ जीडीएस यांना अतिरिक्त वेतन वाढ देण्यात यावी,डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफारशी विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे टीआरसीए १ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्यात.पदाच्या वर्कलोडनुसार नवीन जीडीएसला टीआरसीए देण्यात यावा बीपीएमला पाच तासासाठी साडे चौदा हजार रुपये टीआरसीए देण्यात यावा.अशा विविध अकरा मागण्यांसाठी आज डाक सेवकांनी अमरावती जिल्ह्याचे वरिष्ठ विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनगाव सुरजी येथील ग्रामीण डाक सेवकांनी एकदिवसीय संपात सहभागी झाले आहेत.जर वरील मागण्या शासनाने त्वरित मान्य न केल्यास दिनांक ५ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप करण्यात येईल असे वरिष्ठांच्या आदेशावरून सांगण्यात आले.
याप्रसंगी अंजनगाव येथील संपात दीपकराव वानखडे,एस. पी.सरोदे,शेख खालिक शेख मुसार,निळकंठ खाडे,संदीप काळे,एन.इ.मोरस्कर,सुधाकर नेवारे,तृप्ती वि.हाडोळे,गजानन घुरडे,नारायणराव चिमोटे,जयश्री रंधे,रश्मी बोडखे,शुभांगी अस्वार,वेदश्री गुजर,वैष्णवी रेखाते,अश्विनी इंगोले,डी.बी. गोळे,राजेंद्र बी. चांदुरकर,स्नेहल रोटकर,प्रवीण पी. नेमाडे,आशिष इंगळे,प्रज्वल सोनोने,रवींद्र धुमाळे,केशव काळे,गजेंद्र ढोकणे इत्यादींचा समावेश होता.