येणाऱ्या सणासुदीच्या काळात नेटवर्क बिघडण्याचे संकेत…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
जिल्हा बीड येथे आज दिनांक 06 ऑक्टोंबर 2023 रोजी इंड्स टाॅवर्स लिमिटेड (मूळ पालक) कंपनीच्या कंत्राटदार कंपन्यांच्या टेक्निशियनचे व विविध टेलिकॉम कामगार संघटनेच्या तमाम महाराष्ट्रातून आलेल्या विविध जिल्ह्यांच्य पुढाऱ्यांची बैठक पार पडली.
यामध्ये महाराष्ट्रातून आलेले प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख व काही सदस्य टेक्निशियन कामगारांची उपस्थिती होती. नांदेड येथून जिल्हाध्यक्ष श्री बालाजी पाटील जाधव व श्री रवी चव्हाण, माधव फुलारी, नाशिकचे जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी शिंदे, उमाकांत सोनवणे, सिध्दार्थ थोरात, उध्दव काळदाते, रफिक शहा, राहूल पुंड व इतर जिल्ह्यातून आलेले पुढारी व सदस्य उपस्थित होते.
कंपनी मार्फत होत असलेल्या अन्याय, अत्याचारवर चर्चा झाली व इतर सदस्यांनी होत असलेल्या समस्या मांडल्या जसे की, गेल्या पंधरा वर्षापासून अहोरात्र विज, पाऊस, पूर परिस्थिती, वारा, ऊन अशा खराब हवामानामध्ये ग्राहकांना सुरळीत व अखंडित मोबाईल सेवा पुरवण्यासाठी जीवाची पर्वा न करता आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे चोवीस तास तुटपूंज्या पगारीत काम करत असलेल्या महाराष्ट्रातील मराठी टेक्निशियन कामगारांना स्वतः मराठी माणूस राहून या इंड्सच्या सचिन पाटलाने परप्रांतीय लोकांना हाताशी धरून मराठी कामागारांना कामावर कायमचे न करता त्यांना काढून टाकून परप्रांतीय बाहेरील कामगारांची भरती करण्याचे पाप यांच्याद्वारे केले जात आहेत व चोवीस तास काम करून घेणे, अवेळी व कमी पगार देणे वरिष्ठानकडून वारंवार पैशाची होत असलेली मागणी, मोबाईल टावर चालवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे व अपुरे साहित्य पुरवणे, आणि टॉवर बंद पडल्यास कामावरून काढण्याची धमकी देणे, स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे प्रयत्न करणे, व तशा धमक्या देणे, आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. आणि गेल्या ऑगस्ट महिन्यापासून नांदेड टीम च्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाला पाठबळ देऊन पुढे नेण्याचे एकमताने ठरविण्यात आले. व नांदेड टीम द्वारे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून कंपन्यांना व प्रशासनास वारंवार कामगारांच्या अधिकृत मागण्यांचे निवेदन देण्यात आले परंतु त्याचा कंपन्यांवर व प्रशासनावर कसल्याच प्रकारचा उपयोग झालेला नाही. म्हणून कामगार संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहे. व येत्या सणासुदीच्या काळात पूर्ण मराठवाडा महाराष्ट्राच्या काही भागात नेटवर्क विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत.