गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड – मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी मधुनच आरक्षण देण्यात यावे यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर शनिवारी मराठा समाजाच्या वतीने दुपारी 1 वाजता जाहीर ऐतिहासिक सभेचे अंतरवाली सराटी येथे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असुन या ऐतिहासिक सभेत मनोज पाटील जरांगे यांचे मार्गदर्शन लाभणार असुन या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मराठा समाजाच्या बांधवांनी व महिला भगिनींनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे अव्हान सकल मराठा समाज बांधव नांदेडच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अंतरवाली सराठीमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होणाऱ्या महिला भगिनींनीना मुक्कामाची व्यवस्था , नाष्टा सर्वच व्यवस्था केली असुन मराठा भगिनींनी आपली नाव नोंदणी करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावा , सुचिता जोगदंड पाटिल 8007510423 , 8208857039 , मिनाक्षी पाटिल 91754 50395 , विद्या पाटिल 96655 39053 असे आव्हान सकल मराठा समाजाच्या महिला भगिनींनीच्या वतीने करण्यात आले आहे.