दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- मराठा आणि कुणबी मराठा एकच आहेत हे न्यायमूर्ती एम.जी .गायकवाड आयोगाने ३० पाणी प्रकरणे देऊन १२६ पुरावे दिले आहेत .इतर मागासवर्गीयात मराठा कुणबी चा समावेश असून मराठा आरक्षण सवैधानिक अधिकार असल्याचे प्रतिपादन डॉ.शिवानंद भानुसे यांनी बारूळ येथील आयोजित सकल मराठा आरक्षण परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
अध्यक्षस्थानी व्ही टी शिंदे( नांदेड) हे होते .
डॉ.भानुसे पुढे म्हणाले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ रोजी मराठ्यांना आरक्षण दिले १९६८ रोजी मराठ्यांचे आरक्षण गायब झाले .मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मागासलेला असून समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळणे गरजेचे आहे.इतर मागास वर्गात मराठ्यांचा समावेश असून त्यासह २७ टक्के आरक्षण आहे .मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून नेतृत्व पुढे आले असून १४ तारखेच्या आंतरवाली सराटी येथील मेळाव्यासाठी मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहुन आपली ताकद दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उद्घाटक अॅडवोकेट बालाजी शिरफुले नांदेड यांनी मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देऊन इतर मागासवर्गीयांच्या सवलती द्याव्यात अशी मागणी केली .
प्रारंभी नामदेव पाटील पेठवडजकर, हनुमंत पाटील कदम यांची भाषणे झाली प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे रहाटीचे बालाजी पाटील, प्रकाश श्रीराम पाटील कौशल्य, संतोष पाटील कौसले यांनी पुस्तक भेट देऊन सत्कार् केला .कार्यक्रमाचे संपूर्ण संचलन ह भ प मधुकर महाराज कदम यांनी केले. सकल मराठा आरक्षण परिषदेला बारूळ व परिसरातील जनतेने उपस्थिती लावली होती.