हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार…
दैनिक चालु वार्ता गंगापुर प्रतिनिधी
गंगापूर : मराठा आरक्षणासाठी
मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी (दि. ११) दुपारी १२ वाजता लासूर मार्गावरील राधा कृष्ण मंगल कार्यालयामध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी व नियोजनासाठी संपूर्ण तालुक्यात कॉर्नर बैठका घेण्यात येत आहेत. या अनुषंगाने येथील समन्वयकांची नुकतीच सभास्थळी नियोजन बैठक पार पडली असून, सभेसाठी तालुक्यातील जास्तीतजास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या तालुका समन्वयकांनी केले आहे.
सभा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील कायगाव येथे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहे…