किशोर खंदारे मित्र मंडळाकडून सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता यांना निवेदन.
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
तालुक्यातील तळणी जवळच असलेल्या कानडी गावाच्या रस्त्याची दुरअवस्था झाल्याने नागरिकांस प्रवास करतांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. त्या रस्त्याची दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी किशोर खंदारे मित्र मंडळाकडून सार्वजनिक बांधकाम भवन छ. संभाजीनगर अधीक्षक अभियंता यांना दिले निवेदन
सविस्तर व्रत्त असे की मौजे कानडी ते तळणी मुख्य रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे तळणी वरुन कानडी गावामध्ये जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता असुन या रस्त्याचे काम ६ ते ७ वर्षा अगोदर झालेले होते. सद्यास्थितीला रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले व रस्ता पुर्णपणे खराब झालेला आहे,
प्रस्तुतीसाठी जाणाऱ्या महिला आबाल महिला वृद्ध आजारी पेशेंट, विद्यार्थी व नागरीकांना या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी आपण लक्ष देवुन स. बां. विभाग मंठा – २ यांना पत्र देवून रस्त्याची पाहणी व इंस्टेमेट तयार करण्यास आदेशीत करावे. व सदरील मागणीचा अहवाल शासनास सादर करावा. यावर निर्णय न झाल्यास नागरीकासमवेत आपण आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्यात येईल.तरी पत्राच्या अनुषंगाणे माहिती कळविण्यात यावी. या निवेदनावर किशोर खंदारे यांची सही आहे.
तळणी येथे प्रस्तुतीसाठी जाणाऱ्या महिला अबाल वृद्ध विद्यार्थी यांना या रस्त्यावरून जाताना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो मात्र सर्वात जास्त हाल प्रस्तुतीसाठी जाणाऱ्या महिला वर्गाचे होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या कामाचे इस्टिमेट तयार करून शासनास सादर करावे याची लवकरात लवकर दखल न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम विभागा कार्यालया समोर उपोषणास बसणार.
किशोर खंदारे सामाजिक कार्यकर्ता