दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (परतवाडा) : उपविभागीय कृषि अधिकारी अचलपूर अधिनस्त तालुका फळरोप वाटीका परतवाडा येथील बागेतील १३० संत्रा फळपिकांची विक्री खुला लिलाव्दारे करावयाची आहे.पिकांचा लिलाव गुरुवार दि.१२ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता तालुका फळरोप वाटीका परतवाडा येथे होणार आहे.
लिलावाच्या अटी व शर्ती याप्रमाणे : लिलावात भाग घेणे करीता उपविभागीय कृषी कार्यालयाकडे दोन हजार रुपये सुरक्षा ठेव ऑनलाईन अथवा नगदी जमा करावी. रक्कम लिलाव अंती लिलावात भाग घेतल्यास परत करण्यात येईल.लिलाव मंजुर झाल्यावर लिलावात मान्य झालेल्या खरेदी रक्कमेच्या १/३ रक्कम कार्यालयाकडे तात्काळ खाते क्रं.-११३७३७६६७१७ आयएफएस कोड एसबीआयएन ०००३७१ शाखा- अचलपूर या खात्यावर जमा करावी लागेल.लिलावाची प्रक्रीया कोणत्याही वेळी रद्द करण्याचे सर्व अधिकार विक्री समीतीकडे राखुन ठेण्यात आले आहे.लिलाव झाल्याचे दिनांकापासून ३० दिवासांचे आत खरेदी केलेला माल उचल करावा लागेल.