लोहा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष्य केंद्रीत असलेल्या बहुचर्चित लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय संपादन करीत नांदेडचे खा प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बळीराजा पॅनलचा धुव्वा उडवला आहे.
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या १८ जागेसाठी दि. ७ ऑक्टोबर रोजी मतदान झाले व दि. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचे आ. शामसुंदर शिंदे, काँग्रेसचे आ. मोहन अण्णा हंबर्डे, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण, बीआरएसचे माजी आ. शंकर अण्णा धोंडगे, मन्याड फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ दादा पवार, शेतकरी नेते साहेबराव पाटील काळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १६ जागेवर दणदणीत विजय संपादन करत नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा – शिवसेना (शिंदे) गटाचा धुव्वा उडविला असुन केवळ २ जागेवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सेवा सोसायटी सर्वसाधारण संघ विक्रांत शिंदे (५६८ मते) , चंद्रसेन पाटील (५१७ मते), स्वप्नील उमरेकर (५५० मते), भास्कर ढगे (५२० मते) , दता ढगे (५६० मते), साहेबराव पाटील काळे (५६० मते), धोंडीबा पवार (४९१ मते),
सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ -पुनम क्षीरसागर (५२५ मते), सयंत्राबाई सर्जे (५४३ मते)
सेवा सहकारी संस्था (विमुक्त जाती/ भटक्या जमाती) मतदार संघ – केशव तिडके (५६० मते), ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ –
अण्णासाहेब पवार (५४३ मते) , लक्ष्मीबाई वाकडे ( ५१४ मते), हमाल-मापाडी संघ – भाऊराव कंधारे (२०३ मते सदरील उमेदवार हे महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलचे विजयी झाले आहेत.
भाजपचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा परिवर्तन पॅनलचे व्यापारी मतदार संघाचे पुढील
केशव चव्हाण (११६ मते), किरण वटमवार (१०८ मते)
हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
सदरील निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माधव चौधरी , बोधगिरे , सचिव ए.बी. घोरबांड आदीने परीश्रम घेतले .
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकत्यांनी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने महाविजय संपादन केल्याने लोहा शहरातील मुख्य रस्त्याने गुलाल उधळत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला तर शेकापचे आ. शामसुंदर शिंदे, शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ आशाताई शामसुंदर शिंदे, काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर, मन्याड फांऊडेशनचे एकनाथ दादा पवार ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पा पवार , काॅग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे , विजय पा धोंडगे, अनिल मोरे , शहाजी नळगे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे , साहेबराव काळे सर्व विजयी उमेदवार सह आदीच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढून मोंढा यार्डात विजयी सभा घेण्यात आली.
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दिग्गज उमेदवारांचा झाला असून
यात तालुक्याचे नेते कै. व्यंकटराव मुकदम यांचे चिरंजीव माणिकराव मुकदम, माजी सभापती शंकरराव ढगे, माजी सभापती सुभाष गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य उद्धव पाटील चितळीकर, मारोतराव बोरगांवकर, अंकुश कदम आदींना पराभावाला सामोरे जावे लागले आहे. विक्रांत शामसुंदर शिंदे यांनी खासदार चिखलीकर यांचे कट्टर समर्थक तथा मुरब्बी राजकीय नेते माणिकराव मुकदम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे, या पराभवाने खासदार चिखलीकर यांची लोहा कंधार मतदारसंघातील पक्कड संपुष्टात आल्याचे जाणकार नागरिकाकडून बोलल्या जात आहे. तर महाविकास आघाडीची लोहा कृषी बाजार समितीवर निर्विवाद सत्ता आल्याने खासदार चिखलीकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.