लोहा प्रतिनिधी नांदेड / लोहा
आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर हे जनसामान्यांचे नेतृत्व आहेत असे प्रतिपादन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांनी जुना लोहा येथे रुद्रा पाटील भोस्कर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केले.
आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हभप श्री फळेकर महाराज यांचे हरि किर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
त्यानंतर रुद्रा पाटील भोस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा श्री संत गोरोबा काका मंदिराच्या प्रांगणात आझाद ग्रुप तालुका शाखा लोहाच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आझाद ग्रुपचे मराठवाडा अध्यक्ष तथा सरपंच बाळासाहेब टोपारे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे, पत्रकार विलास सावळे, विनोद महाबळे, शिवराज दाढेल, गोविंद पवार, रमेश पवार , आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रुद्रा पाटील भोस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या हस्ते भला मोठा खारीब खोबऱ्याचा हार घालून केप कापुन तो भरवून अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना भीमाशंकर मामा कापसे म्हणाले की, रूद्रा पाटील भोस्कर हे जनसामान्यांतून नेतृत्व पुढे आले आहे. रुद्रा पाटील भोस्कर यांची सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती व्हावी मी त्यांना आझाद ग्रुपच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो भावी नगरसेवक म्हणून त्यांना माझे पूर्ण सहकार्य राहील असे भीमाशंकर मामा कापसे म्हणाले.
यावेळी किशन भोसकर, बळी रामगिरवार, रवि नागरगोजे, प्रेम सानप, बालाजी दाढेल,अरुण नागरगोजे, सटवा जाधव , फिरदोस शेख, ससाणे , कहाळेकर, रूद्रा पाटील भोस्कर यांचे कुटुंबीय , जुना लोहा येथील नागरिक, महिला भगीनी , मोठ्या संख्येने उपस्थित होते
रुद्रा पाटील भोस्कर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर स्वादिष्ट अन्नदान करण्यात आले.अनेक मान्यवरांनी, नागरिकांनी रुद्रा पाटील भोस्कर यांचे अभिष्टचिंतन केले.