गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोहा तालुक्यात दररोज किमान चार ते पाच खेडेगावात मराठा आरक्षणाची ठिणगी पेटविण्याचे व जनजागृतीचे काम बाळासाहेब जाधव , व लक्ष्मण पाटील मोरे हे आठ ते दहा दिवसांपासून करत आहेत.
अंतरवाली सराटीत १४ ऑक्टोबरला होणाऱ्या भव्य मराठा आरक्षण महासंवाद मेळाव्याची इतिहासात ऐतिहासिक नोंद होणार असुन या महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तर या महाविराट सभेसाठी ३०० एकरवर अभुतपुर्व होणाऱ्या सभेची जोरदार तयारी सुरू झाली असुन स्टेज उभारणीसह मैदान सफाईच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. मराठा आरक्षणच्या या मेळाव्याला ५० लाख मराठा बांधव उपस्थित राहतील आशी माहिती बाळासाहेब जाधव व लक्ष्मण मोरे यांनी मराठा जनजागृती बैठकीत दिली आहे.
लोहा तालुक्यात आतापर्यंत मराठा आरक्षण जनजागृती बैठका ५० खेड्यांमध्ये पार पडल्या असुन अंतरवाली सराठीमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक मराठा आरक्षणाचा मेळाव्याला लोहा तालुक्यातुन ५०० फोर व्हीलर गाड्या सभेसाठी लोहा तालुक्यात रवाना होतील आशी माहिती बाळासाहेब जाधव व लक्ष्मण मोरे यांनी दिली .
अंतरवाली सराठीमध्ये होणाऱ्या मराठा आरक्षण महामेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन सरकार घाम फोडुन सरकारच्या छाताडावर बसुन आरक्षण आम्ही मिळविणारच आशी प्रतिक्रिया सकल मराठा बांधवांच्या ओठातुन ऐकावयास मिळत आहे.