गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
ग्रामपंचायत मौ.शेलगाव.धा.ता. लोहा येथे,आज दिनांक 09/10/2023 रोजी कमल उदवाडीया फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ.अनैता मॅडम,डॉ.हेमंत सर रोशनी मॅडम,मॅनेजर अतिश जाधव सर तसेच शेलगाव मध्ये कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत गावामध्ये सहा महिन्यापासून चालू असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्याची पाहणी करण्यात आली गावामध्ये विविध अशा 10 ठिकाणी मिक्स कचरा टाकल्या जात होता ती सर्वच ठिकाणे ग्रामगटाच्या जनसमुदायातून स्वच्छ करण्यात आली या ठिकाणांची देखील आज वरिष्ठांनी पाहणी केली.
यानंतर गाव,ग्रामपंचायत,शाळा,अंगणवाडी,मंदिरे या ठिकाणी स्वच्छतेची पाहणी केली, सार्वजनिक ठिकाणी व दुकानांसमोर तसेच गावातील सर्वच परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा सुका व ओला कचरा आढळून न आल्याने वरिष्ठांकडून गावाने एकजुटीने तसेच जनसंभागातून केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले
यानंतर इकोसत्व संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गाव ग्रामपंचायत, जय दुर्गा महिला गट तसेच बळीराजा शेतकरी गट, सोबतच बाल स्वच्छता दूत यांना उपस्थित डायरेक्टर यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यानंतर मॉडेल व्हिलेज परिसरातील मॉडेल व्हिलेज साठी सहभागी असलेल्या सहा गावांचे सरपंच उपसरपंच यांना शेलगाव.धा. ग्रामपंचायत लोहा येथे निमंत्रित करून उपस्थित मान्यवरांच्या समवेत व लोहा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी
आडेराव सर तसेच लोहा तालुक्याचे विस्तार अधिकारी देशपांडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली व बैठकीदरम्यान परिसरातील सरपंच यांनी गावातील मूलभूत सुविधा शाळेला कम्प्युटर ,वॉटर प्लांट ,मुलांना खेळण्याची साहित्य,अभ्यासिक,आरोग्याशी निगडित सुविधा इत्यादी सुविधांवर संस्थेने तसेच गटविकास अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करावे,असे विचार मांडण्यात आले जेणेकरून गाव अधिक अधिक सक्षम व समृद्ध होऊन गाव यशस्वी ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करेल, या चर्चेनंतर उदवाडिया फाउंडेशनचे डायरेक्टर यांच्याकडून सकारात्मक दृष्टिकोनातून मॉडेल व्हिलेजसाठी लागणाऱ्या सर्व सुविधांचा आम्ही नक्कीच पुरवठा करू असे आश्वासन गावकऱ्यांच्या समवेत ग्रामपंचायत यांना देण्यात आले.
यावेळी गावच्या वतीने मारोती.कदम यांनी सर्वांचे सत्कार करुन आभार मानले.
यावेळी गावचे सरपंच सौ.लक्ष्मी मारोती कदम, उपसरपंच,कमल उदवाडिया फाउंडेशनचे डायरेक्टर .अनैता मॅडम,डॉ.हेमंत सर रोशनी मॅडम,मॅनेजर अतिश जाधव,पाणी फाउंडेशन संस्थेचे अधिकारी,BDO, विस्तार अधिकारी शिंदे सर, ताटे सर, बालाविकास संस्थेचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,जय दुर्गा महिला शेतकरी गट तसेच बळीराजा शेतकरी शेतकरी गट,ग्रामगट,बाल स्वच्छता शेलगाव परिसरातील सहा गावांचे सरपंच, उपसरपंच,इकोसत्व PC सुरेश घोरपडे सर, इकोसत्व प्रतिनिधी अर्चना खुडे,धनश्री वच्चेवार सोबतच सहकारी योगीराज पाटील उपस्थित होते.
तसेच लोहा तालुक्यातील निळा ,कारेगाव, पिंपळगाव (येवला), हरसद तेथे ही कमल उदवाडीया फाउंडेशन अंतर्गत इकोत्सव संस्था अंतर्गत. इकोत्सव संस्था यांच्या मार्फत घनकचरा व मियावाॅकीचे कामे चालू आहेत.