गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा पं.स.चे मग्रारोहोचे कंञाटी अभियंता गंडबे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे माजी तालुकाध्यक्ष मारोती कांबळे लोहा पं. स.चे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती दिली.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, मग्रारोहोचे कंञाटी अभियंता गंडबे यांनी त्यांच्याकडे असलेल्या गावात पांदन रस्ता,मियावाॅकी वृक्ष लागवड तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, सिंचन विहीर, इत्यादी कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.
पांदन रस्ता व वृक्ष लागवड कामात प्रत्यक्षात कामावर मजूर नसताना ही मस्टर भरुन दिली जातात व बोगस मजुरांच्या नावे पैसे उचलली जातात त्याकामी गंडबे हे मुल्यमापन करुन देतात.
तेव्हा लोहा पं. स. चे मग्रारोहयोचे कंञाटी अभियंता गंडबे यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा गटविकास अधिकारी लोहा पं.स . कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मारोती कांबळे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.