दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
काल दि. 10. 10. 2023 रोजी मंगळवारी श्री शिवाजी प्राथमिक शाळा नवीन कौठा महाडा येथे दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिरामध्ये डॉ. भगवती आंबटवाड डॉ. साहिल बगाडे डॉ. निकिता वाघमारे व इतर डॉक्टरांनी सहभाग घेतला होता
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची दातांची तपासणी करून त्यांना दातांची काळजी कशी घ्यायची या विषयावर योग्य मार्गदर्शन केले…
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक नामदेव गवळे सर यांच्यासह स्वामी सर विश्वासराव सर सय्यद सर स्वामी मॅडम लुंगारे सर व इतर शिक्षकांचा सहभाग होता
कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक नामदेव गवळे सर यांनी आलेल्या सर्व डॉक्टर टीमचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले…