एचव्हीपीएम कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांनी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर साकारले अलौकिक नृत्य
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावती जिल्हा परिचित आहे.विदर्भाची कुलस्वामिनी कुलदैवत म्हणून आई अंबाबाई आणि एकविरा देवी यांची पूजा याठिकाणी केली जाते.अत्यल्प दिवसातच नवरात्र महोत्सव येवून ठेपलेला आहे.शारदीय नवरात्र उत्सवात येथे देशभरातील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात.अंबादेवी संस्थान व एकविरा देवी संस्थान हे आध्यात्मिक,कला,संस्कृती,आरोग्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचं झालेल्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून दिसून येते.
नवरात्रीच्या या पार्श्वभुमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा युवा महोत्सव कार्यक्रम नुकताच प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे संपन्न झाला.या युवा महोत्सव दरम्यान एचव्हीपीएम कॉलेज ऑफ इंजिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नृत्य कलेच्या माध्यमातून माता अंबाबाईचे दर्शन घडविले.