दै.चालु वार्ता
कुरुळा प्रतिनिधी संभाजी वडजे
नांदेड/कंधार :जालना जिल्हातील आंतरवली सराटी येथील मराठा आरक्षण योध्दा तरूण पिढीचे मार्गदर्शक श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला आंबूलगा(गौळ) ता.कंधार परिसरातील व ग्रामीण भागातून लाखो तरूण , ज्येष्ठ नागरिक, महीला मोठ्या संख्येने स्वयंस्फुर्तीने सहभागी होणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्हातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला .व उपोषणाला बसले होते.संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील बांधव समोर येवून जाहीर पाठिंबा देत,सरकारचा निषेध व्यक्त केल्या जात होता. शासनाच्या उद्धठ धोरणाच्या विरोधात अंत्ययात्रा काढण्यात आल्या.
नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील आंबूलगा (गौळ) व परिसरातून लाखो मराठा बांधव जालना जिल्हातील आंतरवली सराटी येथील मराठा योध्दा श्री मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड येथील सभेत सर्व मराठा बांधवांना आवाहन केले होते. तुम्ही कोटी च्या संख्येने आंतरवली सराटी येथे मराठा आरणषणासाठी सभा ठेवली असून आपण प्रत्येक घरातील एक मराठा बांधवांनी या सभेला उपस्थित राहून सहभागी होऊन आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला सोयीस्कर होण्यासाठी आवश्यक आहे . या आव्हानांला प्रतिसाद देत आंबूलगा ( गौळ ) परिसरातून तरूण, ज्येष्ठ नागरिक मराठा बांधव आंतरवली सराटी येथील सभेला काही जण दि. १२ रोजी जाऊन सभेच्या तयारीला मदत करण्यासाठी जाणार आहेत. आणि बाकीचे दि. १३ रोजी संध्याकाळी रवाना होणार आहेत. तरुण बांधव , ज्येष्ठ नागरिक यांची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत आंबूलगा (गौळ) येथून सभेला दोनशे हून अधिक बांधव रवाना होणार आहेत.