दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे..
श्री शिवाजी हायस्कूल माणिक नगर नांदेड येथील कु.प्रचिती येलमगोंडे वर्ग दहावीतील विद्यार्थिनी हिने नांदेड महानगरपालिका विभागातून जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिची विभागीय पातळीवर लातूर याठिकाणी निवड झाल्याबद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सचिव गुरुनाथरावजी कुरुडे साहेब, अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब, शालेय समिती सदस्य मधुकरराव कुरुडे सर , सूर्यकांतरावजी कावळे सर, शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीरभाऊ कुरुडे साहेब , उपमुख्याध्यापक डी.पी कदम , शाळेचे पर्यवेक्षक सदानंद नळगे, शिवराज पवळे, क्रीडा शिक्षक सुशील कुरुडे, ज्येष्ठ शिक्षिका सौ.विजयाताई कुरुडे, सौ पद्मा वरवटकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सौ.कविता तिर्थे यांनी प्रचितीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले. तसेच शाळेतर्फे संस्थेतर्फे आणि सर्व शिक्षक वृंदातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.