लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत विजयी झालेल्या संचालकाचा गावकऱ्यांच्या वतिने सत्कार…
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर:- येथून जवळच असलेल्या मौजे
जोशी सांगवी ता.लोहा येथे १०लक्ष
रू.च्या सि.सि.रस्त्याचे भुमिपुजन लोहा-कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आले. व त्यानंतर आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांचा गावकऱ्यांच्या वतिने शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.यानंतर
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सर्व संचालक मंडळी यांचा जोशीसांगवी येथील गावक-याच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित गावातील नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम आमदार श्यामसुंदरजी शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचे जोशीसांगवी गावात आगमण होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदारपणे स्वागत करुन शेतकरी कामगार पक्षाच्या बैलगाडीत आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ.आशाताई शिंदे यांना बैलगाडीत बसवुन गावातील प्रमुख रस्याने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ.आशाताई शिंदे यांचे घरोघरी महिलानी आरती उतारून व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.याप्रसंगी स्वप्निल पा.उमरेकर संचालक,श्याम अण्णा पवार खरेदी विक्री संघ उपसभापती लोहा, अवधुत पा.शिंदे शेकाप जिल्हाध्यक्ष नांदेड, माणिकराव पा.वाकडे संचालक, विश्वंबर पा.क्षीरसागर संचालक, धोंडीबा पाटील पवार संचालक,अण्णासाहेब पवार संचालक, मधुकरराव डाकोरे संचालक, अशोक पाटील टर्के, बालाजी पाटील चेअरमन किवळा, बंडु पा.पवार संचालक, राजु पा.वडवळे माजी सरपंच कापशी, फुलाजी पाटील ताटे उपसरपंच सरपंच पोखरभोसी , जोशीसांगवीच्या प्रथम नागरिक ( सरपंच )वंदनाताई परमेश्वर थोटे आरती ताई मोरे (उपसरपंच)विक्रम पाटील मोरे, बाळू अनंदवाड,आनंदराव देशमुख, सचिन पा.कुदळकर, हनुमंत पाटील डोनवाडेकर शेकाप जिल्हा सचिव नांदेड तथा उपसरपंच डोनवाडा,सिद्धू पा.वडजे, राजु पा.शिंदे, सतीश पाटील शिंदे
ढाकणीकर,, सुधाकर सातपुते,जमीर पठाण,व्यंकटी पा.आढाव, हानमंत पोकले, गोविंद पा.ढाकणीकर, सामाजिक कार्यकर्ता सिकंदर शेख उस्माननगर ,प्रशांत पा.आढाव, यांची उपस्थिती व सर्व ग्रामपंचायत सदस्य जोशीसांगवी व महिला, पदाधिकारी, गावातील महिला,पुरुष व पत्रकार बांधव उपस्थित होते.