
दै.चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
अंबाजोगाई. अंबाजोगाई येथील मानव विकास निवासी मूकबधिर मतिमंद व अपंग विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक सचिव मा. श्री. राजकिशोरजी मोदी यांच्या हस्ते प्रथम डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. तद्नंतर दिव्यांग दिनाचे ध्वजारोहण करून ध्वजास सलामी देण्यात आली.
आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रसंगी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक श्री. आनंद टाकळकर, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. परमेश्वर चव्हाण, अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इंद्रकुमार लोढा जोधाप्रसाद मोदी शाळेचे मुख्याध्यापक श्री.गायकवाड सर हजर होते सोबत बडे सर, शिंदे सर, चव्हाण सर, साठे सर, पंडित सर, बारस्कर सर, घाडगे सर, कोंबडे सर, पवार मॅडम, नांदुरकर सर, कसबे सर,अंबाड सर, शिनगारे सर, गायके सर, बाबजे सर, शेख अखिल, सतिश चव्हाण उपस्थित होते.