श्री ह भ प सदानंद म रायवाडीकर यांच्या रसाळवाणीतुन भागवत कथेस प्रारंभ
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – लोहा तालुक्यातील पांगरी गावात व पंचक्रोशीतील प्राचीन प्रसिद्ध असलेली व तुळजापुरचं ठाणं नावाने नावलौकिक असणारी आई काळंकाई मातेच्या नवरात्र महोत्सवास पांगरी येथे प्रारंभ झाला आहे.
नवरात्र महोत्सवात दैनंदिन कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी ८ वा , व राञी ७ वा आई काळंकाई मातेची महाआरती, दि १५ :१०:२०२३ रविवारी घटस्थापनेच्या दिवशी श्री ह भ प सदानंद महाराज रायवाडीकर यांच्या रसाळवाणीतुन राञी ७:०० ते १०:०० भागवत कथेला प्रारंभ होईल.भागवत कथेस गजानन महाराज कऱ्हाळे, ओम महाराज काटकर , माधव महाराज पवार यांची साथ राहील तर , दिनांक १५ रविवारी रुक्मिणीमाय मोकले ( देवकरीण ) यांचा अराधी गितांचा जागर होईल. नवरात्र महोत्सवात दैनंदिन अन्नदान होईल.
नवरात्र महोत्सवात दिनांक १६ सोमवारी सकाळी ८ ते १२ यावेळेत डाॅ. चंद्रकांत मोरे तुळजाई आय केअर सेंटर लोहा मोफत नेत्र तपासणी शिबिर मोफत मोतीबिंदू शिबिर व श्री मल्टीस्पेशालिटी डेन्टंल क्लीनीक लोहा डॉ पुजा दिपक बोंडारे , व डॉ सुषमा रमाकांत जायभाये दंत व मुखरोग तज्ञ यांच्या भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा अशी अशी विनंती नवराञ महोत्सवाच्या वतीने करण्यात आली आहे .
दिनांक २४:१०:२०२३ रोजी सकाळी ९ ते ११ श्री ह भ प शंकर महाराज लोंढे यांचे काल्याचे किर्तन होईल.
पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी भागवत कथेसह नेञरोग तपासणी शिबिर , दंत शिबीर सह नवरात्र महोत्सवातील कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती समस्त गावकरी मंडळी पांगरी यांनी केली आहे.