दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा:- नांदेड जिल्हातील लोहा तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथील शेतकरी इंदुताई शिवराज पाटील यांच्या शेतातील जेके एनर्जी सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्याचा जोर जास्त प्रमाणात असल्यामुळे झाडे मोडून पडले आहेत. आणि ती झाडे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलवर पडून सोलर पॅनलचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशाप्रकारे अतोनात नुकसान झाले आहे. पिंपळगाव शेलगाव धानोरा पार्डी या गावातील सोसाट्याचा वाऱ्यामुळे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.