दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट शिखर संस्था मुंबईच्या म्हसळा तालुका स्थानिक शाखा कार्यकारणीचे अध्यक्ष रामदास रिकामे आणि त्यांच्या कार्यकारणीचा पंचवार्षिक कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी नव्याने म्हसळा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, शिवकृपा ग्रामीण पतसंस्था मर्यादित चेअरमन दिलिप कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.म्हसळा गवळवाडी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात संपन्न झालेल्या कार्यकारणी निवड सभेत मावळते अध्यक्ष रामदासशेठ रिकामे,सचिव सुजित काते यांनी आयोजित केलेल्या बैठकीत माजी सभापती रविंद्र लाड म.या.ट्रस्टचे माजी विश्वस्त लक्ष्मण कांबळे,विश्वस्त शांताराम घोले,मुंबई माजी कार्याध्यक्ष गणेश वाजे, यादव समाज उन्नती संस्था माजी अध्यक्ष अशोक काते, दिपेंद्र धुमाळ ,मोहन किळजे,रामचंद्र खताते,राजेंद्र काते,मधुकर घोले,गणपत महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.नवनियुक्त अध्यक्षपदी दिलीप कांबळे यांचे सह उपाध्यक्ष कृष्णा दिवेकर,सचिव दत्ताराम महाडिक,सहसचिव प्रकाश लाड,खजिनदार मधुकर लाड यांची तर १४ सदस्यांची कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना समाज बांधवांना सोबत घेऊन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे कामकाज करून ट्रस्टचे ध्येय धोरण गावोगावी लोकांपर्यंत पोहचविणार असून समाज बांधवांना अभिप्रेत असे काम करून दाखवू असे ग्वाही दिली.उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणी मंडळाचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.