
नवी दिल्ली : गुरुवारी 26/11 या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत स्वामीने एक ट्विट केले आहे. यांनी मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
.स्वामींनी ट्विट केले की, ‘हे धक्कादायक आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी यूपीए सरकारमध्ये गृह मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी राहिलेले आरव्हीएस मणी यांनी उघडपणे पाकिस्तानी अजमल कसाब आणि दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान पडद्यामागे काय घडले होते ते सांगितले आहे. हे टीडीकेसह पाकिस्तानचे कृत्य होते.
मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे. मात्र, टीडीकेचे नाव लिहून स्वामींनी अखेर कोणावर निशाना साधला हे स्पष्ट झालेले नाही. स्वामी यांनी ज्या मणी यांचे नाव घेतले आहे, त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत युपीए सरकारने घेतलेल्या भूमिकांवर या आधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन वर्षांपूर्वी मणी यांनी हा हल्ला पाकिस्तान आणि तेव्हाच्या युपीए सरकारमधील फिक्स मॅच होती असा आरोप केला आहे.
लोकसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी युपीए अस्तित्वात नसल्याचे वक्तव्य केल्याने देशातील विरोधकांमध्ये वाक् युद्ध सुरु झाले आहे. स्वामींनी पुढे म्हटले की, देशहिताचे कारण देत राज्यसभा सचिवालयाने हा प्रश्न राज्यसभेत विचारण्याची परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
याचबरोबर चीनच्या सैन्याने लडाखमध्ये एलएसी पार केलेली का, हा प्रश्न विचारण्यास परवानगी दिली नसल्याचेही ते म्हणाले. यासाठी देशासाठी महत्वाचा प्रश्न असल्याचे कारण देण्यात आल्याचे स्वामी म्हणाले.