दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे. जालना (मंठा )
भाजपा महिला आघाडीच्या मंठा तालुका अध्यक्षपदी श्रीमती यमुना शेषनारायण दवणे यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र मा मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ यांच्या हस्ते देण्यात आले. दवणे यांचे पती शेषनारायण दवणे(एन. डी.)हे भाजपाचे मंठा तालुका सरचिटणीस म्हणून काम केले आहे. सौ यमुना दवणे ह्या मंठा नगरपंचायत वॉर्ड क्र.(६)च्या नगरसेविका आहेत यानंतर आता दवणे यांच्याकडे मंठा तालुक्यातील महिलांचे संघटन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बोलताना यमुना दवणे म्हणाल्या की, मंठा शहरासह तालुक्यातील महिलाना भाजपाच्या झेंड्या खाली एकत्र आणुन त्याच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असून शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी गणेशराव खवणे, प्रल्हादराव बोराडे बाबुराव शहाणे, विठ्ठल मामा
काळे, समंदर पठाण, आनंद जाधव, संजय
गायकवाड, एन डि दवने, ईश्वर आबा गऊत,आकाश राऊत, सचिन वाघमारे, विलास रामेश्वर भोसले, अनिल चव्हाण, घोडके,जयश्री ताई पवार, अन्साबाई राठोडसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.