दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
भारतीय जनता पक्षाच्या मंठा शहराध्यक्षपदी कैलाश बापू बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर यांनी ही नियुक्ती केली. शहरप्रमुख कैलाश बापू बोराडे हे मा नगर अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक होते. मा मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर भाजपा मंठा ता अध्यक्ष यांनी ही
नियुक्ती केली आहे. कैलाश बापू बोराडे यांनी समाजकारणत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. मा मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर भाजपा मंठा ता अध्यक्ष सतिश राव निर्वळ. यांनी कैलाश बापू बोराडे यांचा सत्कार केला. यावेळी
प्रल्हादराव बोराडे बाबुराव शहाणे , विठ्ठल मामा काळे, समंदर पठाण, आनंद जाधव,संजय गायकवाड,एन डि दवने, ईश्वर आबा राऊत,आकाश राऊत, सचिन वाघमारे, विलास
रामेश्वर भोसले, अनिल चव्हाण,
घोडके, यमुनाबाई दवने,जयश्री ताई पवार, अन्साबाई राठोडसह भाजप कार्यकर्ते र्मोठ्या संख्येने
उपस्थिती होते.