दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (तिवसा) : आजाद समाज पार्टीचे मोर्शी तालुका अध्यक्ष अक्षय पांडे यांच्या नेतृत्वात तिवसा विधानसभा मतदारसंघातील मंगरुळ भिलापुर या गावात दि.१७ ऑक्टोबर २०२३ रोजी आझाद समाज पार्टीच्या शाखेचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मंगरूळ भिलापूर शाखा फलकाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव मा.मनिष साठे आणि जिल्हा कार्याध्यक्ष मा.सनी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.विदर्भ संघटक तथा जिल्हा प्रभारी किरण गुडधे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.यासोबत संपर्क प्रमुख संजय गडलिंग आणि अमरावती शहर उपाध्यक्ष जितेंद्र रामटेके यांनी जनतेसमोर आझाद समाज पार्टीची भुमिका स्पष्ट केली.
मंगरूळ भिलापूर शाखेचे अध्यक्ष म्हणून आशिष राऊत,उपाध्यक्ष-गौरव मेश्राम,सचिव-जितेंद्र मोलके,सहसचिव-शुभम पांडे तर सदस्य म्हणून अजय मोहोड,प्रविण गव्हांदे,शुभम मेश्राम,आकाश मेश्राम,गौतम मोलके,अमित खंडारे,प्रशांत गजभिये,अनिकेत चोपडे,योगेश मोलके यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी शिरखेड,शिरजगाव आणि नेर पिंगळाई या गावातील कार्यकर्ते शाखा पदाधिकारी तसेच गावातील उपसरपंच,सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.