दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी घेतली हर्षवर्धन पाटील यांची भेट..
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर): झगडेवाडी व गोखळी येथील ग्रामस्थांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन झगडेवाडी व गोखळी गावातील सर्व लोकांना इंदापूर कडे जाण्यासाठी आणि बारामती, निमगाव वरून गावात येण्यासाठी तसेच शेंडेवस्ती व फडतरे वस्ती येथील सर्व लोकांना इंदापूर वरून येण्यासाठी व बारामती निमगाव कडे जाण्यासाठी पालखी महा मार्गावरती दुभाजक ठेवल्यामुळे सर्व नागरिक विध्यार्थी शेतकरी यांना दोन चाकी, चार चाकी गाडी , व इतर वाहने ने आन करता येत नाही व अडथळा निर्माण झाला आहे. म्हणून दोन्ही गावाच्या वतीने निवेदन देण्यात आले व झगडेवाडी व गोखळी दोन्हीं गावातील लोकांना, शेतकरी, विध्यार्थी, जेष्ठ नागरिक या सर्वांना जाण्यायेण्यासाठी योग्य ती सोया करून द्यावी म्हणून मागणी करण्यात आली आहे.
त्या नंतर हर्षवर्धन पाटील यांनी लगेचच संबंधित प्रोजेक्ट डायरेक्टर घोडके सर यांना फोन करून समस्या सोडावण्या बाबत सूचना केली आहे. यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखाना व्हॉइस चेअरमन कांतीलाल झगडे, गोखळी गावच्या उपसरपंच रेखा नामदेव झगडे, दीपक झगडे सर, ऍड नितीन राजगुरू, नामदेव झगडे, झगडेवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब झगडे, माजी उपसरपंच मच्छीन्द्र झगडे, युवानेते रणजित झगडे, भाऊ झगडे सर, लक्ष्मण झगडे सर, मोहन झगडे, विलास झगडे, नितीन ढगे, विजय झगडे, आणि दोन्ही गावातील ग्रामस्थ, शेतकरी या सर्वांनी एकत्र मिळून मागणी केली आहे.