दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
श्री शिवाजी जुनिअर कॉलेज माणिक नगर नवीन कौठा येथील 12 विची विद्यार्थिनी कुमारी पूनम संतोष कांबळे या विद्यार्थिनीने 81 किलो वजन गटातील विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले
भूमी अशोक नरवाडे या 12 विच्या विद्यार्थिनीने धनुर्विद्या( रिकव्हर राऊंड )या क्रीडा प्रकारामध्ये विभागीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले आहे
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम धोंडगे संस्थेचे सचिव गुरुनाथराव कुरुडे सहसचिव अडओकएट मुक्तेश्वरराव धोंडगे प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे उपप्राचार्य मधुकर शिंदे सर शालेय समिती पर्यवेक्षक वसंत राठोड सर शालेय समिती सदस्य वैजनाथराव कुरुडे सर सूर्यकांत कावळे सर शालेय समिती सदस्य मधुकररावजी कुरुडे सर शालेय समिती सदस्य इंद्रजीत बुरपल्ले सरआदी मान्यवरांनी व कॉलेजमधील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी त्यांचे अभिनंदन केले या खेळासाठी क्रीडा शिक्षक प्राध्यापक कपिल सोनकांबळे व क्रीडा शिक्षक सुशील कुरुडे सर यांनी मार्गदर्शन केले
वरील दोन्हीही विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली आहे तेव्हा त्यांना पुढील खेळासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या…