दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी परिसरातील शहानुर नदीकाठी भद्रकाली माता मंदिर वसलेले आहे.शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराची पुरातन आख्यायिका असल्याचे सांगितले जाते.सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे या भद्रकाली मातेच्या मंदिरात हजारो भाविक दर्शनाला येतात.नवरात्रात सुवासिनी आई भद्रकाली मातेची ओटी भरतात.नवरात्रोत्सवाच्या या पर्वावर २२ ऑक्टोबर २०२३ रोजी येथील आयोजकांनी भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.तर सर्वोत्कृष्ट दांडिया गटाला प्रथम,द्वितीय,तृतीय,चतुर्थ,पाचवे व सहावे असे बक्षीस वितरण करण्यात येणार असून स्पर्धकांनी या दांडिया स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले आहे.