श्री शारदीय नवरात्र महोत्सव 2023 संगीत सेवेत सहभाग.
माहूर ता.प्र.विनोद भारती शारदीय नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तीपीठ पैकी एक पीठ असलेल्या माहूरच्या रेणुका मातेच्या चरणी संगीत सेवा देण्याची 175 वर्षांची अखंड परंपरा कोरटकर परिवाराने जपली आहे. पंचमीच्या दिवशी मातेच्या चरणी नित्य सेवा देण्याची परंपरा कोरटकर परिवाराची आहे. या कार्यक्रमात इंडियन आयडल फेम भाग्यश्री टिकले यांनी भक्तगणांना आपल्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध केले. यावेळी तबला वादक संजय कोरटकर, प्रशांत कोरटकर, श्वेता टिकले, संदेश कान्हू, रवींद्र व्यवहारे मंचावर उपस्थित होते.