पैठण प्रतिनिधी गजानन ठोके
राज्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातींच्या आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाज बांधवाकडून सोलापूर धुळे महामार्गावरील जामखेड फाटा तालुका अंबड येथे दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जालना व संभाजीनगर जिल्ह्यातील पाच ते सहा हजार धनगर समाज बांधव आपल्या पारंपारिक वेशभूषेसह या आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाला महिला भगिनी व तसेच शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनीही सहभाग नोंदवला
येळकोट येळकोट जय मल्हार आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदी घोषणेने परिसर दणाणून गेला यावेळी समाजातील प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली राज्यात धनगड आणि धनगर एकच असून केवळ स्पेलिंग मिस्टेक मुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित असल्याचे मत प्रमुख वक्त्यांनी मांडले राज्य सरकारने धनगर समाजास वेळ न घालवता त्वरित एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी नसता राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा धनगर समाज बांधवांतर्फे देण्यात आला
तब्बल एक तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे सोलापूर धुळे महामार्गावरील तीन ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता
अंबड चे तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांनी आंदोलन स्थळी पोहोचून धनगर समाज बांधवांकडून निवेदन स्वीकारले व या आंदोलनाची सांगता करण्यात आली…