दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- कंत्राटी नोकर भरतीचे परिपत्रक रद्द केल्याची घोषणा फसवी आहे,आणखी लढाई लढावी लागेल असे प्रतिपादन माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी केले. ज्ञान ज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याजवळ सभेचे आयोजन केले होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्याम निलंगेकर हे होते.यावेळी सोपानराव मारकवाड,प्रभू सावंत,ऍड.प्रशांत कोकणे,दत्तात्रय अन्नामवाड, यशवंत थोरात,शीतल भवरे, कावेरी ढगे,कनिष्क सोनसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने २ ऑक्टॉबर (म.गांधी यांच्या जयंती दिन) पासून संघटक श्याम निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल भवरे,कावेरी ढगे,प्रियांका कदम,विनोद वाघमारे,लता बंडगर,प्रा.विलास भालेराव यांनी अमरण उपोषण केलं होत.
कंत्राटी नोकर भरतीचं परीकत्रक परत घेतलं असलतरी,हजारो कुशल अकुशल वर्ग चारची पदे खाजगी यंत्रनेच्या माध्यमातून भरून,वेटबिगारी कायद्याच उल्लंघन केलं जात आहे,ही वेटबिगारी संपेपर्यंत आपला लढा चालूच राहणार असल्याची भूमिका श्याम निलंगेकर यांनी मांडली.कंत्राटी नोकर भरती परिपत्रक परत घेण्याचं आश्वासन सरकारच्या वतीने मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी ६ ऑक्टॉबर रोजी लेखी दिल्यावर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली होती.
या उपोषणास आरक्षण हक्क संवर्धन समितीचे मार्गदर्शन, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे,माजी आमदार गंगाधर पटणे,आरक्षण हक्क संवर्धन समितीचे प्रदेश अध्यक्ष पांडुरंग कवाने,उपाध्यक्ष सोपानराव मारकवाड,प्राचार्य गिरीश चौडेकर,आरक्षण हक्क संवर्धन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.प्रशांत कोकणे,सचिव दत्तात्रय अन्नामवार,संजय वाघमारे (दलित सेना) दीपक पवळे ( भीम प्रहार ) ऍड.यशवंत मोरे,यशवंत थोरात,रमेश सोनाळे (रिपब्लिकन हक्क परिषद) संदीप मांजरमकर (रिपब्लिकन सेना नांदेड) देविदास इंगळे (राष्ट्रीय सविधान बचाव अभियान) सूर्यकांत चौदंते (सामजिक कार्यकर्ता) कॉ.राम घायाळे (भा. क.पा) कनिष्क सोंनसळे (वंचित नेते) बाळासाहेब सुतार (राष्ट्रीय ओबीसी महासंघ), अतुल बनसोड,ऍड.आकांक्षा आळण,माधव जमदाडे,प्रेमिला वाघमारे (रिपब्लिकन सेना), नितीन बनसोडे (रिपब्लिकन युवा सेना) सौ.ललिता भगवान कुंभार (ओबीसी नेत्या) गंगाधर वांगे (ओबीसी नेते) डॉ.गंगाधर सोनकांबळे (सामाजिक न्याय विभाग,काँग्रेस कमिटी) जयश्री यशवंतकर (काँग्रेस कमिटी नांदेड) गणपत पाचंगे (ओबीसी नेते) कुलदीप शिंदे (सुजान नागरिक) डॉ.बोयाळे (बहुजन भारत पार्टी) साईकिरण सलगरे (सामाजिक कार्यकर्ते) निखिल चिंचोलीकर (शिवसेना शिंदे गट) स्वप्निल बुक्तरे (एस.एफ.आय) प्रशांत गोडबोले (रिपब्लिकन सेना नांदेड) भीमराव बुक्तरे (बहुजन युथ पॅंथर) डी.जे.रसाळे (भारतीय बौद्ध महासभा) बळीराम निखाते (बहुजन समाज पार्टी) एस.पी.ठमके,अभिमन्यू पंडित (गणराज्य संघ) हत्तीअंबीरे पालमकर (वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष नांदेड) बी.बी.सुगावकर,प्रभू सावंत (बहुजन नेते) काकासाहेब डावरे (रावण साम्राज्य सेना) इंजि. प्रशांत इंगोले (वंचित) सोम भारती (आम आदमी पार्टी) वाघमारे तुळशीराम (राष्ट्रीय चर्मकार महासंघ) परमेश्वर भुजंगराव चौदंते (महाराष्ट्र पत्रकार महासंघ) ए.एस.वाकोडे (जिल्हा परिषद शिक्षिका नांदेड़) शिरसे अनिल (रिपब्लिकन सेना नांदेड) बालाजी पाटील जाधव (संभाजी ब्रिगेड नांदेड) इत्यादी लोकांनी पाठिंबा दिला.