दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा : लोहारा शहारांमध्ये मुख्य रस्त्यावर व हायस्कूल या शाळेसमोर व सभोवतील भागा मध्ये तसेच शहरामध्ये मटका अवैध लॉटरी याचे प्रमाण वाढले असून शाळकरी मुलेदेखील पैशाचे आमिष यामुळे खेळण्यास धजावत असल्यामुळे सदरची अवैध लॉटरी व्यवसाय मटका हे बंद करण्यात यावेत या मागणी साठी संभाजी ब्रिगेड का.आ. लोहारा पोलीस स्टेशण ला निवेदन दिले आहे.निवेदनात पुढे म्हंटले आहे .की शासनाने ऑनलाइन लॉटरीवर बंदी आणलेली असताना देखील लोहारा शहरांमध्ये मटका तसेच लॉटरी चा व्यवसाय तेजी मध्ये असून याकडे आपल्या पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे यापूर्वी देखील काही वृत्तपत्राने व पक्षाने याकडे लक्ष वेधले होते परंतु त्यानंतर छोटीशी कारवाई होऊन सदरचे व्यवसाय पुन्हा चालू झाले आहेत रोडवर चालणारे व्यवसाय असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जर दहा दिवसांमध्ये सदरची व्यवसायिक बंद नाही झाली तर संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड का.आ. ने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेड का.आ.तालुकाध्यक्ष महेश गोरे,सचीव गगांराम भोंडवे,शहरध्यक्ष प्रशांत थोरात,ओकांर चौगुले, शभु वाले,महेश पांचाळ,आदीच्या निवेदनावर सह्या आहेत.