दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील पेठवडज येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून तेथील परिचारिका म्हागाडे मॅडम यांनी रूग्णांना उपचार करत नसून उध्थट बोलून गरीब रुग्णांना म्हणतात की जा बाहेरील मेडिकल मधून औषधे व गोळ्या, इंजेक्शन घेऊन या तेव्हा मी उपचार करतो. जर तुम्हाला काही करायचे असेल तर बेशक करू शकता. आमदारांकडे जा, खासदारांकडे जा, कलेक्टर कडे जा माझे कोणीही काहीही करू शकत नाही.असे उद्धटपणे बोलून रूग्णांना नाहक त्रास करीत आहेत. तेथील सेवक वडजे यांना विचारले असता ते म्हणाले आमच्या दवाखान्यात औषधे उपलब्ध नाहीत आम्हाला औषधे दिली नाहीत तर बाहेरील मेडिकल वरून विकत आणा आम्ही ईलाज करता. सध्या रोगाचे प्रमाण वाढले असून पेठवडज परीसरातील अनेक गावामध्ये मलेरिया, डेंग्यू ची साथ सुरू असून सरकारी दवाखान्यात मोफत उपचार केला जात नाही तर गरीबांना वाली कोण आहे. शासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच औषधी पुरवठा करावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.