दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : शिरूर या ठिकाणी, शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतरांचा गुणगौरव पुरस्कार पार पडला. शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानात ज्यांनी मोलाचा वाटा उचलला अशा गुणवंत शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शिरूर तालुक्यातील समाजसेवेचा वसा घेतलेले युवा नेतृत्व योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुलदादा करपे यांनाही मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शिरूर तालुक्यातील कुटुंबाचा मी एक छोटा भाग आहे आणि या कुटुंबातील सदस्यां नी केलेला सत्कार पुढील कार्यासाठी ऊर्जा देत असतो.या सत्काराला वेगळे महत्त्व आहे. या बद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील.शिक्षणाचा महत्वाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असून, त्याचा विकास हेच आपले अंतिम ध्येय ठेवत शिक्षकांनी मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन या वेळेस राहुलदादा करपे यांनी केले. या वेळी शिरूर तालुक्याचे मा.आमदार मा.काकासाहेब पलांडे, मा. जयवंतराव आसगावकर (शिक्षक आमदार, पुणे ), श्री. बाळासाहेब म्हस्के (तहसीलदार,शिरूर), श्री.कमलाकर म्हेत्रे (शिक्षणाधिकारी जि. प.पुणे), मा.श्रीम.स्नेहा गिरिगोसावी ( नायब तहसीलदार,शिरूर), श्री.अनिलजी बाबर (गटशिक्षणधीकारी, पं.स.शिरूर), श्री.नंदकुमार सागर (अध्यक्ष, मुख्यध्यापक संघ), श्री. बाळकृष्ण कळमकर (शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.शिरूर), श्री.किसनदादा खोडदे (शिक्षण विस्तार अधिकारी पं.स. शिरूर), श्री. सुधाकरजी जगदाळे (उपाध्यक्ष, सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज पतसंस्था, मुंबई), श्री. प्रसादजी गायकवाड (सचिव, मुख्याध्यापक संघ), श्री. सोमनाथजी भंडारे (अध्यक्ष शिरूर-हवेली शिक्षक संस्था), श्री.दादासाहेब गवारे (राज्य प्रवक्ते टी.डी.एफ.महा.राज्य), श्री. महेशदादा शेलार (कार्यवाह, शिक्षक परिषद ), श्री. नवनाथजी धुमाळ (अध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी,), श्री.विठ्ठल गवारे (अध्यक्ष शिक्षकेत्तर संघटना, शिरूर), श्री.गणेशदादा मांढरे (अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ शिरूर), श्री.मारुती कदम (सचिव), श्री.रामदास थीठे (कार्याध्यक्ष),श्री.तुकाराम बेनके सर (अध्यक्ष), श्री.अनिल शिंदे, श्री. रामनाथ इथापे, श्री.तुकाराम शिरसाट, श्री.विलास घोडे, श्री.बाळासाहेब चव्हाण,श्री.राजेंद्र भाऊ जाधव (मा.सरपंच दहिवडी), श्री.बाप्पुसाहेब कापरे, श्री.विनायकबाप्पू करपे पा.व सर्व मुख्याध्यापक आणि कार्यकारिणी सदस्य शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता.