गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा / पेनुर : – लोहा तालुक्यातील पेनुर येथे सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी धनगर , बैध्द , कोळी , मुस्लिम , ब्राह्मण , लिंगायत , सह अन्य समाजांनी पाठिंबा देऊन जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेतला.
पेनुरमध्ये छञपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदीचे फलक लावण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समाजाची योग्य बाजु मांडली नसल्याने आज समाजाला रस्त्यावर उतरन्याची वेळ आली असून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे अन्यथा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली असुन या गावबंदीमध्ये पेनुर येथील सकल मराठा बांधव व गावबंदीसाठी पाठिंबा देण्यासाठी अन्य बांधव उपस्थित होते.