
दै चालु वार्ता
अंबाजोगाई- ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालय जवळगाव रोड भारज पाटी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला प्रथम डॉक्टर हेलन केलर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम माध्यमिक विद्यालय भारज या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ढाणे मॅडम या होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक श्री गायकवाड सर यांनी केले व जागतिक दिव्यांग दिन व डॉक्टर हेलन केलर यांची माहिती श्री देशमुख सर यांनी दिली व या नंतर शाळेत रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले व या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रथम द्वितीय तृतीय यांना लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री दशरथ दादा शिंदे यांच्यातर्फे जे बक्षीस ठेवण्यात आले होते त्या बक्षिसाचे वितरण प्रमुख पाहुणे सौ ढाणे मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले