दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना सोबत घेऊन १९५६ साली अशोक विजयादशमी दिनी दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो त्या अनुषंगाने विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने उस्माननगर ता. कंधार येथे बसस्थानक ग्रामपंचायती जवळ आंबेडकर स्मारक जागेत २४ ऑक्टोबर २०२३ रोजी ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र उस्मानगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोणे , सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष देवराव सोनसळे , माजी सरपंच अमिन अदमनकर, सामाजिक कार्यकर्ते अमिनशाह फकीर, सरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, सम्राट अशोक प्रा.शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे, पोलीस पाटील विश्वभंर मोरे , गंगाधर कांबळे , रामदास सोनट्के,सहशिक्षक वामन लोंढे, बालाजी गाडेकर, चांदोबा लोकडे, यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमिनशाह फकीर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच प्रतिनिधी दत्ता घोरबांड यांच्या हस्ते करण्यात आले . ध्वजारोहण झाल्यावर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य तथा बौद्धाचार्य अंगुलीमाल सोनसळे यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे वाचन केले यामध्ये मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेला मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही ,मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणते आचरण करणार नाही, मी सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो यासह २२प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी मोहम्मद शरीफ, बालाजी कांबळे, गफार शेख, माणिक सोसळे, राहुल सोनसळे, स्वप्निल कांबळे धम्मानंद कांबळे , सम्यक कांबळे,सचिन सोनसळे प्रबुद्ध कांबळे , अंकुश कांबळे व बौद्ध उपासक ,उपासिका बालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी ६७ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध बालगायीका प्रबोधनकार, आभाळाएवढी माया फेम गायिका कुमारी नालंदा सांगवीकर यांचा प्रबोधनात्मक भीम गीत गायनाचा कार्यक्रम नागवंशी बौद्ध विहार मैदान उस्मानगर येथे संपन्न झाला. यावेळी महिला पुरुष व बालके गीते ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…