दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा :- मौजे कलंबर खु. ता.लोहा येथील साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा योध्दा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय हनुमान मंदिरासमोर सर्व समाजातील बांधव साखळी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी बॅनरवर लिहिले आहे. हे सरकार एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवू शकते. जनता झोपेत असताना पहाटे ५ वाजता शपथविधी घेवू शकते. रात्रीतून सरकार बदलू शकते तर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी ४० दिवसाचा कालावधी देऊन सुध्दा मराठा आरक्षण न दिल्याने राजकीय पक्ष व नेत्यांना गावबंदी करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून सर्व समाजातील बांधव मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाला बसले आहेत.